#प्रत्येक_मैत्रिणीसाठी
दिवाळी आली की घर प्रकाशमान होतं, पण सर्वात आधी उजळते तीची धावपळ. सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरची साफसफाई, खरेदी, स्वयंपाक, फराळ, सजावट… गडबड सुरू होते.
दिवाळीत घर कसे आनंदाने उजळून निघायला हव हाच विचार तिच्या क्षणोक्षणी मनात पिंगा घालत असतो..
घर आनंदाने झळाळून जावं म्हणून ती क्षणोक्षणी झटत असते.
सगळ्यांच्या आनंदाची काळजी घेताना ती स्वतःचा थकवा विसरते.
पण या झगमगाटात ती एक गोष्ट विसरते ,
"प्रकाश फक्त घरात नाही, तो तिच्यातही आहे."
दिवाळीचा अर्थ फक्त फराळ, सजावट, आणि पाहुणचार नाही
तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणणं आहेच पण त्याचबरोबर स्वतःच्या चेहऱ्यावरही आनंदाचा दरवळ दिसायला हवा...
सगळ करण्याच्या नादात.... स्वतः कडेही लक्ष द्यायला हवं...
स्वतःला सांगायला हवं....
ऐक ना,
सगळं परफेक्ट नसलं तरी हरकत नाही,
एखादं काम पुढं मागं झालं तरी चालेल,
एखादा दिवा विझला तरी तू आहेस ना,
पुन्हा उजळवण्यासाठी, पुन्हा लावण्यासाठी.
घराचा दरवळ सुगंधी असतो तेव्हा मनाचं वातावरणही प्रसन्न असेल…म्हणून मनातले ओझे, चिंता, अपेक्षा थोड्या वेळासाठी बाजूला ठेव.
या दिवाळीत, सगळ्यांना आनंद दे, आणि स्वतःलाही घे .
कारण, तुझ्यातला प्रकाशच हा घराचं खऱ्या अर्थाने तेज आहे.
आणि तो प्रकाश…तुझ्या मनातला, तुझ्या हास्यातला, तुझ्या थकलेल्या पण समाधानी नजरेतला कधीच मंद होऊ देऊ नकोस! 🪔💛
या दिवाळीत, फक्त घर नाही,
तर स्वतःचं अस्तित्वही उजळव.
आणि थोडं स्वतःसाठीही जग. ♥️
Facebook @सोनाली कुलकर्णी
#दिवाळी #प्रकाश #स्वतःसाठीथोडं #CelebratingHerLight #DiwaliMagic #InnerGlow #followers #highlight #highlightseveryone